महाराष्ट्र

राज्यात नवे निर्बंध लागू, काय सुरु आणि काय बंद राहणार? जाणून घ्या…

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचे डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हॅरिएंट आढळल्यामुळे राज्य सरकारने शुक्रवारी नवी नियमावली लागू केली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यासाठी पाच टप्पे जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार सरसकट सर्व जिल्ह्यांना आणि महापालिकांना तिसऱ्या टप्प्यातील निर्बंधच लागू करावे लागणार आहेत.

डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमावाली लागू करता येणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांना आठवड्याचा आरटीपीसीआर चाचण्यांचा पॉझिटिव्हिटी दर लक्षात घ्यावा लागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करायचे असतील, तर त्यांना मागील दोन आठवड्यांतील कोरोना रुग्णसंख्येचा अभ्यास करावा लागेल.

हवेमधून पसरू शकणाऱ्या कोरोनाच्या प्रकारांना टाळण्यासाठी आस्थापनांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि हवेशीर वातावरण ठेवण्याची सक्ती करावी लागेल. मोठ्या प्रमाणावर आरटीपीसीआर चाचण्या करणे, कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर प्रभावीपणे दंड आकारणे, गर्दी होऊ शकणारे कोणतेही कार्यक्रम टाळणे आवश्यक आहे. प्रतिबंधित क्षेत्रे तयार करताना काळजीपूर्वक आढावा घेणे आवश्यक आहे.

असे असतील नियम :

  1. अत्यावश्यक दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी दोन यावेळेत खुली राहतील.
  2. जमावबंदी आणि संचारबंदी कायम राहील.
  3. सर्व मॉल आणि थिएटर बंद राहतील.
  4. सोमवार ते शुक्रवार हॉटेल ५० टक्के क्षमतेने दुपारी दोनन वाजेपर्यंत खुली राहतील, त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल. ही सुविधा शनिवार-रविवार बंद राहील.
  5. लोकल आणि रेल्वे बंद राहतील.
  6. मॉर्निंग वॉक, मैदाने , सायकलिंग पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत मुभा असेल.
  7. खासगी आणि सरकारी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू असतील.
  8. स्टुडिओत चित्रीकरण परवानगी, मात्र, ते सोमवार ते शनिवार चित्रीकरण करता येईल.
  9. मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के क्षमतेने दुपारी दोन वाजेपर्यंत खुले असणार. हे सोमवार ते शुक्रवार यावेळेत घ्यावे लागतील.
  10. लग्नसोहळे ५० टक्के क्षमतेने, तर अंत्यविधीला २० लोकांना उपस्थित राहण्याची मुभा असेल.
  11. बांधकाम दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा
  12. शेतीविषयक सर्व कामे करता येतील.
  13. ई कॉमर्स दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू असेल.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago