महाराष्ट्र

एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर गिरीश महाजनांची माहिती, समन्वयाचा अभाव पण महायुतीत मतभेद नाही…

मुंबई : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे गावी गेले असताना त्यांची तब्येत बिघडली आणि तिथेच त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर ते ठाण्यात आपल्या निवासस्थानी पोहोचले. पण, अद्यापही शिंदेंना विश्रांतीची गरज असल्याचे सांगण्यात आले. यादरम्यान, भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी शिंदेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी सत्तास्थापनेत जो पेच निर्माण झाला आहे, त्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर गिरीश महाजन यांनी त्यांच्या तब्येतीबाबत अपडेट दिली. मुख्यमंत्र्यांना व्हायरल झाला असून त्यांना तापही आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून सलाईन दिली जात आहे. ते लवकरच बरे होतील आणि ते पुन्हा कामकाजात सक्रिय होतील, असं महाजन म्हणाले. आज फक्त त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. महायुतीमध्ये सर्व ठीक आहे आणि कुठलाही मतभेद नाही, असंही ते म्हणाले.

महाजनांनी मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी सुरु असलेल्या चर्चांवरही स्पष्टीकरण दिलं. याबाबत शिंदेंसोबत काहीही चर्चा झालेली नाही. हा निर्णय वरिष्ठ स्तरावर घेतला जाईल, असं गिरीश महाजन म्हणाले. दीपक केसरकर आणि बावनकुळे यांच्यातील समन्वयाच्या अभावावर बोलताना महाजन म्हणाले की, समन्वयाचा थोडा अभाव होता हे खरे असले तरी आता सर्व काही ठीक आहे. ५ तारखेला होणारा शपथविधी सोहळा अत्यंत दिमाखदार असेल. महाजन यांनी महायुतीत कुठलाही मतभेद नाही आणि याबाबत सर्व चर्चा खोटी असल्याचे स्पष्ट केले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago