महाराष्ट्र

मोठी बातमी : ‘म्युकरमायकोसिस’वरील इंजेक्शन वर्ध्यात तयार होणार, नितीन गडकरींच्या प्रयत्नांना यश

नागपूर : काळी बुरशी (म्युकरमायकोसिस) रोखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अ‍ॅम्फोटेरेसिन बी इंजेक्शनचे उत्पादन वर्ध्यात सुरु झाले आहे. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या इंजेक्शनचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकार्‍यांमार्फत या इंजेक्शनचे वितरण करण्यात येणार आहे. गडकरी यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच हे इंजेक्शन तयार होणे हा दुग्धशर्करा योग आहे, असं जेनेटिक लाईफ सायन्सेसचे संचालक डॉ. क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

अ‍ॅम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनचा तुटवडा पाहता गडकरी यांनी हे इंजेक्शन विदर्भात तयार व्हावे, यासाठी प्रयत्न केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्सेस या कंपनीला १४ मे रोजी अ‍ॅम्फोटेरेसिन बी या इंजेक्शन निर्मितीची मंजुरी मिळाली. महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाकडून ही मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार वर्धा येथून या इंजेक्शनची निर्मिती सुरु झाली आहे. कच्चा माल उपलब्ध झाल्यास दररोज २० हजार इंजेक्शनचे उत्पादन ही कंपनी करणार आहे.

जेनेटिक लाईफ सायन्सेस हे इंजेक्शन १२०० रुपयांमध्ये उपलब्ध करून देणार आहे. सध्या हे इंजेक्शन ७००० रुपयांपर्यंत मिळत आहे. गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे या इंजेक्शनचा परवाना मिळाला असून इंजेक्शन निर्मितीसाठी लागणारा कच्चा मालही गडकरी यांनी उपलब्ध करून दिला. आता हे इंजेक्शन तयार झाले आहे. कच्चा माल उपलब्ध झाला तर या इंजेक्शनची निर्मिती वाढेल आणि तुटवडा जाणवणार नाही. सोमवार पासून या इंजेक्शनचे वितरण सुरु होणार आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

5 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

5 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

5 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago