महाराष्ट्र

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील वहागांव गावच्या हद्दीत अतिशय भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की स्विफ्ट कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. भरधाव वेगाने जाणार्‍या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे घडलेल्या या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे.

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरहून कार (क्र. एम.एच. 07 ए.बी. 5610) ही अतिशय वेगात कोल्हापूरहून पुण्याकडे जात होती. दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही कार वहागांव (ता. कराड) गावच्या हद्दीत असताना चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ही कार महामार्ग ओलांडून पुण्याहून कोल्हापूरकडे जाणार्‍या लेनवर जाऊन अज्ञात वाहनावर आदळल्याने भीषण अपघात घडला. ज्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला, अन्य एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.

कार एवढी वेगात होती की, अपघातानंतर कारमधील पाचही जण कार मध्येच अडकून पडले होते. चुराडा झालेल्या कारमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

ठाणे लोकसभेची जागा राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना यश

ठाणे : ठाणे लोकसभेची जागा राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना यश आलं आहे. ठाण्याची जागा शिवसेनाच…

3 दिवस ago

कचाकचा बटण दाबा प्रकरणात अजित पवारांना दिलासा, निवडणूक अधिकाऱ्यांकडून क्लीन चिट

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या रिटर्निंग ऑफिसरने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित 'मतासाठी निधी' या…

6 दिवस ago

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ७.४५ टक्के मतदान

मुंबई, दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजल्यापासून सूरु झाले…

6 दिवस ago

विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी घेतला मुंबई उपनगर जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा

मुंबई, दि. 24 : जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी नियुक्त अधिकारी आणि…

1 आठवडा ago

मुंबईसह महाराष्ट्राला मतदानाच्या टक्केवारीत अग्रस्थानी आणावे – राज्य विशेष निरीक्षक धर्मेंद्र सिंग गंगवार

मुंबई, दि. 24 : महाराष्ट्राची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात मतदानाची टक्केवारी वाढवून…

1 आठवडा ago

बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास…

मुंबई, दि. २४ : बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास…

1 आठवडा ago