Former Shiv Sena MLA Suresh Namdev Gore passes away
खेड : शिवसेनेचे माजी आमदार सुरेश नामदेव गोरे यांचे करोनामुळे निधन झाले आहे. ते ५६ वर्षांचे होते. १७ सप्टेंबर रोजी करोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू झाले, मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील नामांकित रुग्णालयात २२ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, आई असा परिवार आहे.
गोरे यांना २००९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खेडची उमेदवारी दिली होती. मात्र, काही कारणामुळे ती रद्द करण्यात आली. त्यानंतर त्यांनी २०१४ मध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. २०१४ ते २०१९ दरम्यान त्यांनी खेड आळंदी मतदारसंघाचे आमदार म्हणून नेतृत्वही केले.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…