महाराष्ट्र

पालघरजवळ जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये गोळीबार, पोलीस कर्मचाऱ्यासह अन्य तीन प्रवाशांचा मृत्यू

मुंबई : जयपूर-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. पालघरनजीक चालत्या ट्रेनमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे. एक्स्प्रेस ट्रेनच्या बी-५ या बोगीमध्ये हा प्रकार घडला. त्यानंतर ही एक्सप्रेस मीरारोड स्थानकात थांबवून मृत्यमुखी पडलेल्या चारही व्यक्तींचे मृतदेह शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले.

गोळीबाराची ही घटना जयपूर एक्स्प्रेस (१२९५६) च्या कोच क्रमांक बी-५ मध्ये आज पहाटे ५.३० च्या सुमारास घडली. गोळी झाडणारे आरपीएफ जवान चेतन आणि एएसआय टिका राम हे दोघेही ट्रेनमध्ये प्रवास करत होते. त्यानंतर पहाटे साडेपाचच्या सुमारास आरपीएफ जवान चेतनने एएसआयवर अचानक गोळीबार केल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली.

नेमकं काय घडलं?

पहाटे ५.२३ च्या सुमारास बी ५ कोचमध्ये ही घटना घडली. आरपीएफ जवान चेतन आणि प्रवाशांमध्ये बाचाबाची झाली, त्यानंतर आरपीएफ जवान चेतनने बंदुक काढून प्रवाशांवर रोखली. दरम्यान, त्याचे वरिष्ठ अधिकारी एएसआय टिका राम यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता चेतनने त्यांना गोळ्या घातल्या. त्यामुळे एएसआय टिका राम आणि अन्य तीन प्रवाशांचा गोळ्या लागल्याने मृत्यू झाला. आपत्कालीन साखळी ओढून आरपीएफ जवान चेतन कुमार याने दहिसरजवळ खाली उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाईंदरच्या रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने त्याला शस्त्रासह अटक केली. पुढील तपास सुरू असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

13 तास ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 महिने ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 महिने ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 महिने ago