Fire at the waste plant at Ambegaon in Pune
पुणे : आंबेगाव येथील कचरा प्रकल्पामध्ये स्थानिक नागरिक व राजकीय व्यक्तींनी आग लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला. तसेच कार्यालयातील कॉम्प्युटर, टीव्ही, खुर्च्या, काचेच्या खिडक्या व फर्निचरचे तोडफोड करून मोठे नुकसान केले. ही घटना रविवारी दुपारी सव्वा दोन वाजता घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांसह पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझविण्यासाठी उशीरापर्यंत प्रयत्न सुरू होते. तसेच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.
कचरा प्रकल्प असल्याने काही क्षणात आगीचे आणि धुराचे लोळ आकाशात पसरले. त्यामुळे परिसरात धुर खूप दूर पर्यंत पसरला आहे. अग्निशामक दलाच्या जवानांकडून आग विझविण्यास सुरवात झाली. परंतु कचरा, प्लॅस्टिकमुळे आग वाढत होती. त्यावर अग्निशामक दलाच्या तीन बंबानी पाण्याचा मारा केला. त्यानंतर एक ते दोन तासांनी आगीवर नियंत्रण आले.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…