महाराष्ट्र

वनसेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना मुलाखत तयारीसाठी ‘आर्टी’तर्फे आर्थिक सहाय्य

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ‘वनसेवा मुख्य परीक्षा-२०२४’ उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या मातंग व त्यातील तत्सम उमेदवारांना मुलाखतीच्या तयारीसाठी अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) मार्फत १० हजार रुपये आर्थिक सहाय्य योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना १० हजारांचे एकरकमी आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. मुलाखतीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी केले आहे.

मुलाखतीची तयारी अधिक प्रभावीपणे करता यावी आणि उमेदवारांवरील आर्थिक ताण कमी व्हावा, हा आर्थिक सहाय्य या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे.

या संदर्भातील सविस्तर जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया ‘आर्टीच्या’ अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी:

उमेदवारांनी ‘आर्टी’च्या http:// https://arti.org.in या संकेतस्थळाला भेट देवून NOTICE BOARD या लिंकवर तपशील पहावा, तसेच अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/BSh7vMVDNonGK4C18 या लिंकवर गुगल फार्म भरावा.

थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

5 दिवस ago

विलेपार्ले हादरले! बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…

5 दिवस ago

जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांची नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार आहे.…

5 दिवस ago

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारसोबत समन्वय

मुंबई : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य…

5 दिवस ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या विकासासाठी विविध सामंजस्य करार

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये…

2 आठवडे ago

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : महिलांवरील अत्याचार, छळ आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी अस्तित्वात असलेले कायदे अधिक…

4 आठवडे ago