Fatal accident of truck and Eicher in Kasara ghat, truck driver dies
Accident in Kasara ghat : कसारा घाटात पहाटेच्या सुमारास ट्रक आणि आयशरचा भीषण अपघात झाला आहे. धबधबा पॉईंटजवळ केळ्याने भरलेल्या ट्रकने आयशरला मागच्या बाजूने धडक दिली. या दुर्घटनेत ट्रक पलटी झाल्याने ट्रक चालक पप्पू यादव यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीम, महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ट्रकचालकाचा मृतदेह कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेत पाठविला आहे. कसारा घाटातील अपघातानंतर ट्रकमधील केळ्यांचे ट्रे महामार्गावर इतस्ततः विखुरले होते. काही काळ वाहतूक विस्कळित झाली. अपघातग्रस्त ट्रक क्रेनच्या साहाय्याने बाजूला काढण्यात आला आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…