Farmers should register in large numbers on e-crop survey app
सांगली : ई पीक पाहणी उपक्रमामुळे वस्तुनिष्ठ व अचूक माहिती मिळाल्याने धोरणात्मक बाबींमध्येही अचुकता येईल. त्यामुळे या उपक्रमात सुशिक्षित शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेऊन नोंदणी करावी, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी पेठ येथील शेतकरी शिवाजी बापू माळी यांच्या शेतावर जावून प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी संपत खिलारी, तहसिलदार राजेंद्र सबनिस, तलाठी, शेतकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी तलाठ्यांचे प्रशिक्षण व ॲपचा वापर करताना काही अडचणी येतात का याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्यावतीने सुरु असलेल्या ई-पीक पाहणी ॲपचे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक देत त्यांना या उपक्रमाचे महत्त्व सांगितले. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, हे ॲप वापरण्यासाठी अत्यंत सुलभ आहे. या ॲपवर नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना शासनाकडून दिली जाणारी मदत तात्काळ संबंधितांकडे पाठविणे सोईचे होणार आहे. या ॲपवर पीक नोंदणी करताना किंवा पीक नोंदणीसाठी काही अडचण असल्यास ग्रामीणस्तरावरील तलाठी, कृषी सेवक हे मदत करतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…