महाराष्ट्र

आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास आवश्यक; कसा काढायचा? जाणून घ्या

मुंबई : राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याअंतर्गत आता प्रवास करायचा असेल तर आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास काढावा लागेल. यासाठी अर्ज करून प्रवास करण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना ई-पासची गरज नाही.

अत्यावश्यक कारणासाठी नागरिकांना प्रवास करायचा असल्यास त्यासाठी अर्ज करून ई पास काढावा लागणार आहे. ऑनलाइन ई-पास काढण्यामध्ये अडचण येत असल्यास पोलिस स्टेशनची मदत घेऊ शकता, असं महाराष्ट्र पोलिसांच्यावतीने सांगण्यात आलं आहे. तसेच केवळ अत्यावश्यक कारणासाठीच या सेवेचा वापर करा, असं आवाहनही महाराष्ट्र पोलिसांनी केलं आहे.

ई पास असा काढता येईल :

  1. ई पास काढण्यासाठी प्रथम covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर जा.
  2. ‘apply for pass here’ पर्यायावर क्लिक करून तुम्हाला काही माहिती भरावी लागेल.
  3. त्यामध्ये तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातून किंवा राज्यातून कुठे प्रवास करायचा आहे ते निवडावे लागेल.
  4. काही कागदपत्रे इथे जोडावी लागतील.
  5. प्रवास कोणत्या कारणासाठी करत आहात याची माहिती द्या.
  6. कागदपत्रांची माहिती एकत्रित घेऊन ती अपलोड करा.

तुम्ही अर्ज केल्यानंतर एक टोकन आयडी मिळतो. तुमचा अर्ज मंजूर झाला की नाही? यासाठी तसंच ई-पास काढण्यासाठी तो टोकन आयडी गरजेचा आहे. टोकन आयडी टाकून साइटवरून ई पास डाऊनलोड करता येतो.

ई पासवर तुमची वैयक्तिक माहिती, खासगी वाहनाने प्रवास करणार असल्यास त्याचा क्रमांक, पासची वैधता, क्यूआर कोड इत्यादी माहिती असते. ई पासची हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी सोबत ठेवावी. पोलिसांनी विचारणा केली तर त्यांना हा पास दाखवून प्रवास करता येईल.

‘या’ कारणासाठी काढू शकता ई पास :

    1. कुटुंबातील व्यक्तीचे लग्न, अंत्यविधी यासाठी ई-पास घेता येतो.
    2. आरोग्यसंबंधित तक्रार असल्यास प्रवास करण्यासाठी ई-पास मिळतो.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago