महाराष्ट्र

डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.रजनीश कामत यांची नियुक्ती

मुंबई : राज्यातील पहिले समूह विद्यापीठ असलेल्या डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. रजनीश कमलाकर कामत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता तसेच, इलेक्ट्रॉनिक्स विभागात वरिष्ठ प्राध्यापक असलेल्या डॉ. कामत यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.

राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी डॉ. रजनीश कामत यांची नियुक्ती जाहीर केली. डॉ.कामत यांनी शिवाजी विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स विषयात एम.एससी. तसेच गोवा विद्यापीठातून पीएच.डी. प्राप्त केली असून, त्यांना अध्यापन, संशोधन व प्रशासनाचा व्यापक अनुभव आहे. डॉ.कामत यांच्या 164 संशोधन पत्रिका आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाल्या असून त्यांची 15 पुस्तके व प्रकरणे देखील प्रकाशित झाली आहेत.

कुलगुरु नियुक्तीसाठी राज्यपालांनी छत्तीसगड उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती यतींद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठित केली होती. पुणे येथील भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रा.अनुपम शुक्ल व शासनाचे प्रधान सचिव ओम प्रकाश गुप्ता समितीचे सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. कामत यांची निवड केली. डॉ. होमी भाभा समूह विद्यापीठामध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालय, सिडनहॅम महाविद्यालय, माध्यमिक प्रशिक्षण महाविद्यालय व शासकीय विज्ञान संस्था या 4 संस्थांचा समावेश आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

5 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

6 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago