धुळे

तीन वाहनांचा विचित्र अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू तर 9 जण जखमी

धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर तीन वाहनांमध्ये विचित्र अपघात झाला. ट्रक, रिक्षा आणि क्रुझर या तीन वाहनांमध्ये रात्री १ वाजेच्या दरम्यान अपघात झाला, या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर 9 जण गंभीर जखमी झाले आहेत. धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पुरमेपाडा याठिकाणी हा अपघात घडला. जखमींना धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मालेगावकडून मध्यप्रदेशकडे भरधाव वेगात जाणाऱ्या कांद्याच्या ट्रकने समोर असलेल्या रिक्षाला जोरदार धडक दिली. यामुळे रिक्षाचालकाचं नियंत्रण सुटलं आणि रिक्षा समोरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या क्रूजरवर जाऊन आदळली. यात रिक्षा आणि क्रूजर गाडीचा चुराडा झाला. या विचित्र अपघातात ३ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरु होते.

या अपघातातील मृतांची नावे :

  1. सरलाबाई पंडित सोनवणे (वय २९)
  2. रिक्षा चालक रईस शेख
  3. महेंद्र चुडामन पाटील (वय ५१)

जखमींची नावे :

  1. विद्या भूषण कानडे (वय २१)
  2. ताराबाई अशोक वसरे (वय ५०)
  3. सुपडू बारकू वसरे (वय ५५)
  4. कोयल प्रमोद सोनवणे (वय १२)
  5. सुरेश नारायण सोनवणे (वय ६०)
  6. प्रमोद रमेश सोनवणे (वय ४५)
  7. वसंत पंडित वंजारी (वय ३३)
  8. सुधीर अभिमान पाटील (वय ५४ )
  9. अरुणाबाई प्रमोद पाटील (वय ४५)
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

6 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago