Devendra Fadnavis' announcement on Kirit Somaiya viral video case
मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या या वादग्रस्त व्हिडिओप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे. याबाबत आता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, “हा विषय गंभीर आहे. राजकारणात असे अनेक प्रसंग येतात, ज्यामध्ये संपूर्ण आयुष्य पणाला लागते. या संदर्भात तक्रारी असतील तर द्याव्यात, त्याबद्दल चौकशी करु. कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही. पोलिस कायद्याच्या चौकटीत राहून याचा तपास करतील,” अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
दरम्यान, किरीट सोमय्या यांनी स्वतःच ट्वीट करत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. किरीट सोमय्या यांनी ट्वीटमध्ये वृत्तवाहिनी दाखवत असलेल्या व्हिडीओची सखोल चौकशी करावी अशी मागणी जाहीरपणे केली आहे. मी कोणत्याही महिलेवर अत्याचार केलेला नाही. पण चर्चेत असलेली व्हिडीओ क्लिप आणि आणखी अशाच काही क्लिप असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी चौकशी करावी, सत्यता तपासावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून केली आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…