महाराष्ट्र

राज्यात औरंगजेबाचे उदात्तीकरण नको – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा अमानूष छळ केला. तो महाराष्ट्राला उध्वस्त करायला आला होता. त्याचे उदात्तीकरण कोणीही सहन करणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना विधानसभेत व्यक्त केल्या.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, देशासाठी, धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिले. औरंगजेबाचा कलंक महाराष्ट्रातून पुसला पाहिजे. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे म्हणजे देशद्रोह असून त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. जे लोक औरंगजेबाच्या समर्थनासाठी पुढे येतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर राज्य सरकार काम करत आहे. गोरगरिबांना न्याय देण्याचे काम केले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

नागपूरमध्ये समाजकंटकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago