महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सेवाग्राममधील बापूकुटीला भेट

वर्धा : महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने लढा देत स्वातंत्र्याच्या लढाईला योग्य दिशा देऊन स्वातंत्र्य प्राप्त केले. त्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना बापूंच्या योगदानाचे स्मरण प्रेरणादायी आहे. सेवाग्राम येथील बापूकुटीला भेट दिल्यावर आत्मिक समाधान व ऊर्जा मिळते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने फडणवीस यांनी आज सेवाग्राम आश्रमातील बापूकुटीला भेट दिली. त्याप्रसंगी ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी तर सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने सचिव सिध्देश्वर उमरकर यांनी सुतमालेने स्वागत केले. त्यानंतर बापूकुटीला भेट देत सामुहिक प्रार्थना सभेत उपमुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी आश्रमातील अभिप्राय नोंदवहीत अभिप्रायदेखील नोंदविला. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिस विभागाव्दारे आयोजित बापूकुटी ते चरखागृहापर्यंत जाणाऱ्या पोलिस शिपाई दौड रॅलीला हिरवा झेंडा दाखवून मार्गक्रमण केले.

खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री रामदास आंबटकर, डॉ. पंकज भोयर, समीर कुणावर, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे आदी यावेळी उपस्थित होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago