The two brutally murdered a 15-year-old vegetable seller
जळगाव : बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन सण साजरा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जळगावच्या चोपड्यात एक भयंकर घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून भावानेच बहिणीचा तिच्या प्रियकराचा खून केला. तरुणाने आपल्या बहिणीचा गळा आवळून, तर तिच्या प्रियकरावर गोळी झाडून दोघांचा खून केला.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रात्री अकरा वाजेच्या सुमारास एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा पिस्टल घेऊन स्वतः पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला आणि आपण दोघांना मारून आलो असे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर या मुलाने सांगितल्यानुसार चोपडा शहर पोलिसांनी चोपडा वराड रस्त्यावर जाऊन घटनास्थळी पाहणी केली. त्यावेळी त्यांना एका नाल्यात दोघांचे मृतदेह आढळून आले.
यात मुलाची गोळी मारून तर मुलीचा गळा आवळून हत्या केल्याची स्पष्ट झाले. ऑनरकिलींगच्या घटनेत रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी अल्पवयीन भावासह एक अशा दोन संशयितास ताब्यात घेतले आहे. तर आणखी दोघांचा शोध सुरु आहे. वर्षा कोळी (वय 20, रा. सुंदरगढी, चोपडा ) आणि राकेश संजय राजपूत (वय, २२, रा. रामपूरा चोपडा) अशी मयत प्रेमीयुगलाची नाव आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करुन मृतदेह ताब्यात घेतले आहेत. चोपडा शहरातील तरुण राहत असलेला रामपुरा तसेच तरुणी राहत असलेल्या सुंदरगढी भागात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक रूषिकेश रावले करीत आहेत.
काय आहे प्रकरण?
वर्षा कोळी आणि राकेश संजय राजपूत यांचे एकमेकांवर प्रेम होते. हे दोघे शुक्रवारी रात्री पळून जाणार होते. याबाबतची माहिती वर्षाच्या लहान भावाला मिळाल्यानंतर तो बहिणीवर लक्ष ठेवून होता. दरम्यान, राकेश वर्षाच्या घरी आला. यावेळी वर्षाच्या लहान भावासह इतर तीन जणांनी या दोघांना दुचाकीवर बसवून चोपडा ते वराडे रोडलगत असलेल्या नाल्याजवळ आणले. याठिकाणी वर्षाच्या भावाने राकेशच्या डोक्यात गोळी झाडून त्याचा खून केला. त्यानंतर त्याने बहिण वर्षाचा रुमालाने गळा आवळून खून केला.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…