महाराष्ट्र

कोरोनाला आळा घालायचा असेल तर गर्दी टाळलीच पाहिजे – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : राज्यात कोरोनाला आळा घालायचा असेल तर गर्दी टाळलीच पाहिजे, यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर गोष्टी बंद करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. पण राज्यात तुर्तास लॉकडाऊनची गरज नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबईत टास्क फोर्स आणि आरोग्य खात्याची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

राजेश टोपे यांनी यावेळी ऑग्युमेंटेंड रिस्ट्रिक्शनविषयी सूतोवाच केले. कोरोनाला आळा घालण्यासाठी टास्क फोर्सने ऑग्युमेटेंड रिस्ट्रिक्शनचा पर्याय सुचवला आहे. याचा अर्थ आपल्याला अनावश्यक सेवा किंवा गोष्टी बंद करण्याचा विचार करावा लागेल. ज्या गोष्टींमुळे दैनंदिन जीवनात काही अडणार नाही, अशा अनावश्यक गोष्टी बंद करण्यासंदर्भात चर्चा झाली. बैठकीतील सगळे निष्कर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात येतील. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

टोपे म्हणाले की आगामी काळात कोरोना चाचणीसाठी आरटीपीसीआर टेस्टऐवजी अँटिजेन टेस्टचा वापर वाढला पाहिजे. एखादी व्यक्ती अँटिजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आली तर पुन्हा तिची आरटीपीसीआर टेस्ट करु नये. तसेच अँटिजेन चाचण्यांचा रिपोर्ट कोव्हिन पोर्टलवर जात नाही. त्यामुळे संबंधितांनी याची माहिती स्वत:हून जिल्हाधिकाऱ्यांना दिली पाहिजे, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले.

  • राज्यात विकेंड लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता. विकेंड लॉकडाऊनच्या काळात गार्डन, चौपाट्या आणि धार्मिकस्थळे पूर्णपणे बंद राहतील.
  • विकेंड लॉकडाऊनच्या काळात धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांनाही बंदी
  • सोमवार ते शुक्रवारी रात्री १० ते सकाळी ५ पर्यंत संचारबंदी लागू राहील.
  • शाळा, महाविद्यालये आणि पर्यटनस्थळांच्या परिसरात जमावबंदी
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago