महाराष्ट्र

पीक विम्याचा अग्रीम दिवाळी पूर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल – कृषीमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे

बीड : जिल्ह्यात पीक विम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी जमा होईल असा शब्द मी आज देतो, अशा शब्दात कृषीमंत्री आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना वचन यांत्रिक लाभ योजनेतील लाभ वितरण प्रसंगी दिले. जिल्हा विकासाच्या वाटेवर न्यायचा आहे हेच उद्दीष्ट ठेवून आपण काम करीत आहोत असेही ते यावेळी म्हणाले. येथील सामाजिक न्याय भवन परिसरात कृषी विभागातर्फे देण्यात आलेल्या ट्रॅक्टरचे वाटप त्यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी. के जेजूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुंडे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना ट्रॅक्टरची चावी आणि प्रमाणपत्र देण्यात आले. ट्रॅक्टर प्रदान लाभार्थ्यांना मुंडे यांनी आवाहन केले कि, मिळालेले ट्रॅक्टर केवळ आपल्यापुरते मर्यादित न वापरता आपले काम झाल्यावर इतर शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल अशा माफक शुल्कावर उपलब्ध करून द्यावे.

कृषीमंत्री यांच्या प्रयत्नाने बीड जिल्ह्यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत २०२३ – २४ मध्ये, कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान योजनेमध्ये २४५ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला. यासाठी एक कोटी 47 लाख 25 हजार रुपये खर्च झाले. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 162 शेतकरी लाभांवीत झाले असून यासाठी ६५.४० लाख रूपयांच्या निधी निधी खर्च करण्यात आला.

राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये अनुदान वितरणासाठी तीन कोटी 17 लाख 79 हजार 89 हजार रुपये वितरीत करण्यात आला. याचा लाभ ५२६ शेतकऱ्यांनी घेतला. असे एकूण पाच कोटी तीस लाख 44 हजार रुपयांचा निधी बीड जिल्ह्यास मंजूर करण्यात आलेला आहे. यामुळे जिल्ह्यातील निवड सूची यादीतील ९३३ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
यांत्रिकीकरणामुळे शेतीची कामे वेळेवर व मजुराच्या तुलनेत कमी खर्चात होतील. जसे की पिक पेरणीपूर्व मशागत, काडणी व मळणी, फवारणी, आंतरमशागत करणे. नियोजनाच्या दृष्टीने जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे संपर्क करून यांत्रिकीकरण योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago