महाराष्ट्र

विधानसभाध्यक्षपदावर काँग्रेसचाच हक्क! महाविकास आघाडीत वादाची ठिणगी?

मुंबई : काँग्रसचे नेते नाना पटोले यांनी काल विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला होता. दरम्यान, ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडीत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनाम्याबाबत नापसंती दर्शवली. महाविकास आघाडीचे सरकार स्थिर होत आहे, अशावेळी राजीनामा देण्याची गरज नव्हती, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे सरकारसमोर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मुद्दा उभा ठाकला आहे. सह्याद्रीवरील मंत्रीमंडळ बैठकीनंतर याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदावर चर्चा करून निर्णय घेऊ, असं महाविकास आघाडीतील नेते म्हणत असताना आता विजय वडेट्टीवार यांनी विधानसभाध्यक्षपदावर काँग्रेसचाच हक्क असल्याचं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले कि, “विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं आणि आताही विधानसभा अध्यक्ष पदावर काँग्रेसचाच हक्क आहे. तीन पक्ष मिळून सरकार बनवलं, तिन्ही पक्ष मिळून निर्णय घेऊ , काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद याबाबत तिन्ही पक्ष बसून निर्णय घेणार , सरकार स्थिर आहे, आमचा किमान समान कार्यक्रम ठरलाय , प्रदेशाध्यक्षांना मंत्री पद द्यायचं का? याबाबत हायकमांड निर्णय घेणार.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago