Congratulations to young Ironman Abhishek Nanavare from Deputy Chief Minister Ajit Pawar
मुंबई : दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत अभिषेक सतिश ननवरे या बारामतीच्या सुपुत्राने यशस्वी कामगिरी करत राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे, अवघ्या अठराव्या वर्षी अभिषेकने केलेल्या या कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युवा आयर्नमॅन अभिषेक ननवरेचे अभिनंदन केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार अभिषेकचे कौतुक करताना म्हणाले कि, “शारिरिक क्षमतेचा कस लावणाऱ्या आयर्नमॅन स्पर्धेत अभिषेकने १८० किलोमीटर सायकलींग, ४२.२ किलोमीटर धावणे आणि समुद्रात ३.८ किलोमीटर अंतर समुद्रात पोहणे ही आव्हाने १३ तास ३३ मिनीटे अशा विक्रमी वेळेत पूर्ण केली. अभिषेकचे वडील सतिश ननवरे यांनी यापूर्वी आयर्न मॅन हा किताब पटकविला आहे. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून अभिषेकने अवघ्या अठराव्या वर्षीच ही यशस्वी कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीचा सर्वांना अभिमान आहे, त्याच्या पुढील वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा.”
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…