महाराष्ट्र

घाबरुन जाऊ नका, वेळ पडलीच तर रहिवाशांना एअरलिफ्ट करा!, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश;

पुणे : रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यात भीषण परिस्थिती आहे. गेल्या २४ तासांत ३७० मिलीमीटर पाऊस झाल्यानं पुण्यातील स्थिती गंभीर आहे. शेकडो घरांमध्ये पाणी शिरलं आहे. खडकवासला धरणातून ४० हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

नागरिकांनी आपल्या सुरक्षेचा काळजी घ्यावी. घाबरुन जाऊ नये, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं आहे. ‘पुणे जिल्हाधिकारी, पुण्याचे महापालिका आयुक्त, पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त, लष्कराचे कर्नल यांच्याशी मी संपर्क साधलेला आहे. प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. त्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरु आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

पुण्यातील काही भागांमध्ये पाणी साचल्यानं रहिवासी अडकले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी एनडीआरएफ, पालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. वेळ पडलीच तर आम्ही रहिवाशांना एअरलिफ्ट करु. यासाठी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधण्यात आलेला आहे. प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. रहिवाशांना सुरक्षित स्थळी नेण्याच्या सूचना केलेल्या आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे मदत पोहोचेल. त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहेत. लोकांनी काळजी करु नये. प्रशासन तुमच्या मदतीला आहे, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ‘अजित पवार स्वत: कंट्रोल रुममध्ये आहेत. त्यांनी पुण्यातीस परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. ते अधिकाऱ्यांना सूचना करत आहेत. गरजूंना सगळी मदत देण्यात येईल. त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था केली जाईल,’ अशी माहिती शिंदेंनी दिली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago