Mla Vinayak Mete Death In Road Accident At Pune Expressway
मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पाच वेळा विधानपरिषद आमदार राहिलेले विनायक मेटे भाजपसोबत युतीमध्ये होते. विनायक मेटे यांचं १४ ऑगस्ट रोजी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या भीषण कार अपघातात निधन झालं.
दरम्यान, मेटे यांची पत्नी ज्योती मेटे यांनी कार चालकाच्या दाव्यावर संशय व्यक्त केला आहेत. त्यामुळे मेटेंच्या मृत्यू प्रकरणाबाबत घातपाताचा संशय निर्माण झाला आहे. अखेर या सर्व बाबींची राज्य सरकारने दखल घेतली असून हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अपघातात मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दरम्यान विनायक मेटे यांचा अपघात नसून घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असं सांगितलं. ही चौकशी पारदर्शकपणे व्हावी, अशी मागणी विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केली.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…