Chief Minister Eknath Shinde's directive to increase the pace of booster vaccination
मुंबई: राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांना कोविड प्रतिबंधक लशीचा दुसरा तसेच बूस्टर डोस देण्यासाठी नियोजन करुन लसीकरणाची गती वाढवावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज “कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सव” अंतर्गत लसीकरणाचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला. विधिमंडळातील समिती कक्षात सुभाष पाटील आणि अशका पवार यांना लस देण्यात आली. परिचारिका लता कोहाड यांनी त्यांना लस दिली.
यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, अपर मुख्य सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालक दीपक कपूर, आरोग्य आयुक्त डॉ. रामास्वामी एन., आरोग्य संचालक डॉ साधना तायडे आदी उपस्थित होते. आरोग्य उपसंचालक डॉ. विजय कंदेवाड, डॉ. हेमंत बोरसे, ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कैलास पवार, सहाय्यक संचालक डॉ संजीव जाधव, डॉ. विलास साळवी यांनी संयोजन केले.
केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सवाअंतर्गत सर्व शासकीय केंद्रांवर १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस दिली जाणार आहे. मात्र नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लशीची दुसरी मात्रा घेऊन सहा महिने अथवा सव्वीस आठवड्यांचा कालावधी पूर्ण केलेला असावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…