छत्रपती संभाजी नगर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘औरंगाबादची विकासाकडे घोडदौड’ पुस्तिकेचे प्रकाशन

औरंगाबाद : जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे प्रकाशित ‘औरंगाबादची विकासाकडे घोडदौड’ या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी (३१ जुलै) विभागीय आयुक्त कार्यालयात झाले. या माहिती पुस्तिकेमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात आलेल्या शासनाच्या योजना आणि प्रकल्पाची फलनिष्पत्ती याविषयीच्या माहितीचा समावेश आहे.

प्रकाशनाप्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड,खासदार इम्तियाज जलील, सर्वश्री आमदार अब्दुल सत्तार, हरिभाऊ बागडे, अतुल सावे, संदीपान भुमरे, माजी आमदार रामदास कदम, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक नीलेश गटणे, माहिती संचालक हेमराज बागुल आदी विभागाचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि माहिती संचालक हेमराज बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पुस्तिका तयार करण्यात आली.

पुस्तिकेमध्ये कोविड कालावधीमध्ये जिल्हा प्रशासनाने केलेले काम, स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग , धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग, ऑरिक सिटी, डीएमआयसी प्रकल्प, उभारी 2.0, संतपीठ, हरित औरंगाबाद, सामाजिक सुरक्षा,डिजिटल औरंगाबाद, कौशल्य विकास, वाहतूक आणि दळणवळण व्यवस्था आदी माहिती देण्यात आलेली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

7 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago