छत्रपती संभाजी नगर

कीर्तनकारांचं पॉर्न व्हिडीओ प्रकरण : अखेर महिला आणि पुरुष कीर्तनकारांविरोधात गुन्हा दाखल

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील एका महिला आणि पुरुष कीर्तनकाराचा शारीरिक संबंध प्रस्थापित करत असतानाचा अश्लिल व्हिडीओ व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. अशा प्रकारचे दोन व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. या प्रकरणात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील पुरुष कीर्तनकार आणि महिला कीर्तनकार यांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला होता. अखेर वैजापूरच्या त्या कीर्तनकारासह महिलेविरोधातही शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी रविवारी रात्री ज्ञानेश्वर माणिकराव खिल्लारे यांच्या फिर्यादीवरून पुरुष कीर्तनकार याच्यासह त्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेली अनेक वर्षे कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले वैजापूर तालुक्यातील 48 वर्षीय महाराज आणि सिल्लोड तालुक्यातील 40 वर्षीय महिला कीर्तनकार या अश्लील व्हिडिओ क्लिपमध्ये नको त्या अवस्थेमध्ये दिसून आले. या महाराजांना एक मुलगा देखील आहे. सदरील व्हिडिओ हा महाराजांनी चित्रित केल्याचंही या चित्रफितीमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडीओ क्लिपमध्ये दिसणारी महिला ही देखील कीर्तनकार आहे. या दोघांचाही मोठा भक्त परिवार असून यू ट्यूबवर मोठे फॉलोअर्सवर सुद्धा आहेत.

दरम्यान, व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर या कीर्तनकार महिलेने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. तिच्यावर औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

3 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

3 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

3 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

3 आठवडे ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

1 महिना ago

विलेपार्ले हादरले! बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…

1 महिना ago