Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar
चंद्रपूर : चंद्रपूर येथील राजुरा ग्रीनफिल्ड विमानतळ हा या भागाच्या औद्योगिक विकासासाठी तसेच पर्यटनासाठी महत्त्वाचा आहे, त्यामुळे या विमानतळ उभारणीचे काम गतीने पूर्ण करावे असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. विधान भवनात यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी व्याघ्र संवर्धनात अडचणी निर्माण होऊ नयेत याकरीता उपाययोजना आखण्यास अधिकाऱ्यांना सांगितले आहे. मुनगंटीवार यांनी सांगितले की, चंद्रपुर जिल्हा व परिसराच्या औद्योगिक विकासासाठी हा विमानतळ फार महत्वाचा आहे. त्याचबरोबर येथील वन पर्यटन, पर्यावरण व व्याघ्र संवर्धन, आणि आदिवासींच्या वनोत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठीही या विमानतळाचा मोठा उपयोग होणार आहे.
वन्यजीव मंडळाच्या ऑक्टोबर मधील नियोजित बैठकीत या विमानतळासंदर्भातील सर्व परवानग्या मिळविण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी संबंधित अधिकारीवर्गाला दिले. या प्रस्तावित विमानतळाच्या धावपट्टीची लांबी आणि त्यापलिकडील सुरक्षा क्षेत्र यासंदर्भात निर्माण झालेल्या समस्यांवरही आजच्या बैठकीत तोडगा काढण्यात आला.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…