Calling for applications for Research Fellowship from M.Phil, Ph.D students through 'Barty'
मुंबई : सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (BANRF-2021) अंतर्गत 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत कायम नोंदणी (Confirmed Registration) असणाऱ्या तसेच विज्ञान व तंत्रज्ञान विषयामध्ये नामांकित विद्यापीठामधून पीएच.डी. करू इच्छिणाऱ्या परंतु नोंदणी न झालेल्या संशोधक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
BANRF-2021 अंतर्गत एकूण 200 विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्यात येणार आहे. याअंतर्गत एम.फिल/ पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना RGNF/NFSC च्या धर्तीवर JRF साठी रु. 31000/- व SRF साठी रु. 35000/- प्रतिमहा प्रमाणे अधिछात्रवृत्ती रक्कम तसेच वार्षिक आकस्मिक खर्च, घरभाडे रक्कम देण्यात येते. एम.फिल साठी एकूण 2 वर्ष, पीएच.डी. साठी एकूण 5 वर्षे तसेच एम.फिल / पीएच.डी (Integrated Course) एकूण 5 वर्षे अधिछात्रवृत्ती विद्यार्थ्यांना देण्यात येते. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी बार्टीचे अधिकृत संकेतस्थळ https://barti-maharashtragov.in ला भेट देण्याचे आवाहन बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…