buldana alleged case of medical negligence cotton caesarean operation died
बुलढाणा : शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून झालेली एक चूक एका कुटुंबाला खूपच महागात पडली आहे. सिझेरियन ऑपरेशनदरम्यान एक कापसाचा बोळा महिलेच्या पोटात राहिला. जेव्हा 2 महिन्यांनंतर हे उघडकीस आले तेव्हा त्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूरमधील कवठाळ येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. पूजा पाखरे असे मृत महिलेचे नाव आहे.
पूजा यांना प्रसूतीसाठी 7 एप्रिल रोजी खामगाव उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सामान्य प्रसूती न झाल्यामुळे पूजा यांचे सिझेरियन ऑपरेशन करण्यात आले आणि त्यांनी एका मुलाला जन्म दिला. परंतु, प्रसूतीनंतर ३-4 दिवसांनी अचानक पूजा यांच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यामुळे 11 एप्रिल रोजी त्यांना अकोल्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवसांनी बरे वाटल्यानंतर त्यांना 19 एप्रिल रोजी घरी आणले. पण 10 जून रोजी पुन्हा वेदना सुरु झाल्या.
धक्कादायक! कोरोनाच्या भीतीमुळे संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या…
कुटुंबियांनी त्यांना खामगावचे डॉक्टर अरविंद पाटील यांच्या रुग्णालयात नेले. तेथे त्यांची सोनोग्राफी करण्यात आली. तेव्हा पूजा यांच्या पोटात काहीतरी असल्याचे आढळून आले. पूजा यांना पतीने उपचारासाठी माहेरी पाठविले. तेथे त्यांच्यावर ऑपरेशन करून त्यांच्या पोटातून कापसाचा बोळा बाहेर काढण्यात आला. मात्र, पूजा यांना ऑक्सिजनची आवश्यकता भासल्यामुळे बुलडाण्याच्या सहयोग रूग्णालयात दाखल करण्यात आले, पण पूजा यांना विषबाधा झाली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मृत पूजा यांच्या पतीने डॉक्टरांच्या दुर्लक्षाबद्दल रुग्णालय प्रशासन, पोलिस प्रशासनाकडे तक्रार केली आहे. बुलडाणाचे सिव्हिल सर्जन डॉ नितीन तडस यांनी सांगितले की आमच्याकडे यासंदर्भात तक्रार आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी 6 जणांची चौकशी समिती गठीत केली आहे. चौकशीत जो कोणी दोषी आढळेल, त्याच्याविरूद्ध कठोर कारवाई केली जाईल.
तरुणाने पत्नीची दिवसाढवळ्या चॉपरने भोसकून केली हत्या, त्यानंतर…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…