क्राईम

तरुणाने पत्नीची दिवसाढवळ्या चॉपरने भोसकून केली हत्या, त्यानंतर…

जळगाव : एका तरुणाने पत्नीची बाजारात दिवसाढवळ्या चॉपरने भोसकून हत्या केली. बुधवारी दुपारी १.३० वाजता पाळधी गावात ही खळबळजनक घटना घडली आहे. त्यानंतर आरोपीने पत्नीच्या माहेरी जाऊन मेहुण्यावर चॉपरने वार केले. त्यानंतर पत्नी जिंवत आहे का ते पाहण्यासाठी पुन्हा हा तरुण बाजारात आला, त्यावेळी ग्रामस्थांनी त्याला चांगला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेत पूजा सुनिल पवार (वय २६) यांचा मृत्यू झाला असून शंकर भिका चव्हाण (वय २०) गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा आणि सुनिल पवार (वय ३४) या दाम्पत्यामध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता. त्यामुळे गेल्या १६ फेब्रुवारीपासून पुजा माहेरी म्हणजे पाळधीत राहत होती. तरीही या दोघांमध्ये वाद सुरूच होते. दरम्यान, सुनिलच्या सततच्या त्रासाला कंटाळून पुजा व तिच्या कुटुंबीयांनी सुनिलविरोधात पाळधी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्याबाबत चौकशीसाठी पोलिसांनी सुनिलला बुधवारी बोलावले होते. मात्र, तो पोलिस ठाण्यात न जाता पूजाला मारण्यासाठी गेला. दुपारी दीड वाजता सुनिलची पत्नी पुजा लहान मुलीसोबत एका दुकानात खरेदी करत होती. तिथे जाऊन सुनिलने तिच्यावर चॉपरने वार केले. त्यामुळे गंभीर जखमी होऊन पूजा तेथेच कोसळली. तर सुनिल चॉपर घेऊन पूजाच्या घरी गेला. तिथे त्याने मेहुणा शंकर याच्या पोटात चॉपरने तीन वार केले आणि निघून गेला.

त्यानंतर हा विक्षिप्त तरुण पत्नी जिवंत आहे की मृत पावली हे पाहण्यासाठी पुन्हा घटनास्थळी आला. यावेळी काही जणांनी सुनिलला पकडून चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, पूजा आणि शंकर यांना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात नेले. परंतु, तिथे डॉक्टरांनी पूजाला मृत घोषित केले. शंकरवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी रुग्णालयात येऊन जखमी शंकर याचा जबाब नोंदवून घेतला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago