बीड : बीड तालुक्यातील लिंबारुई परिसरात ३१ डिसेंबर २०२५ रोजी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पतीकडून नवीन मोबाईल फोन न मिळाल्याच्या रागातून २४ वर्षीय महिलेने आपल्या साडेतीन वर्षांच्या मुलासह शेतातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
मृत महिलेचे नाव प्राजक्ता उर्फ राधा रामेश्वर दराडे (वय २४) असून, तिच्या मुलाचे नाव वेदांत (वय ३ वर्षे ५ महिने) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्राजक्ता गेल्या काही दिवसांपासून पती रामेश्वर बाबासाहेब दराडे यांच्याकडे नवीन मोबाईल फोनची मागणी करत होती. आर्थिक अडचणींमुळे पती मोबाईल देऊ न शकल्याने दोघांमध्ये वाद झाला.
या वादानंतर रागाच्या भरात प्राजक्ताने टोकाचा निर्णय घेत शेतातील विहिरीत मुलासह उडी मारल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. घटनेनंतर सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणाची नोंद अपघाती मृत्यू (ADR) म्हणून केली होती. मात्र, सखोल चौकशी व पतीच्या पुरवणी जबाबानंतर या घटनेमागील नेमकी पार्श्वभूमी स्पष्ट झाली.
यानंतर ३१ जानेवारी २०२६ रोजी या प्रकरणी सविस्तर एफआयआर दाखल करण्यात आली. कायदेशीर प्रक्रियेनुसार, मृत आई प्राजक्ता हिच्याविरुद्ध निष्पाप मुलगा वेदांत याला बुडवून मारल्याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुदीराज करत आहेत. साध्या मोबाईल फोनच्या कारणावरून दोन जीव गेले, यामुळे संपूर्ण लिंबारुई परिसर शोकसागरात बुडाला आहे.
दरम्यान, समाजशास्त्रज्ञ व तज्ज्ञांचे मत आहे की वाढता मानसिक ताण, संवादाचा अभाव आणि क्षुल्लक कारणांवरून होणारा अनियंत्रित राग अशा दुर्दैवी घटनांना कारणीभूत ठरत आहे. अशा प्रसंगी समुपदेशन व कौटुंबिक संवाद अत्यंत महत्त्वाचा असल्याचे ते सांगतात.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…