congress leader and revenue minister balasaheb thorat criticized bjp over bjp free vaccine promise
मुंबई : राज्यांना मोफत लस देणे ही केंद्र सरकारची जबाबदारी असताना निवडणुका आहेत म्हणून फक्त बिहारला मोफत लस देणार, मग महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणून त्यांना करोनावरील लस देणार नाही का?, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी केला आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, करोना महामारीने जनता त्रस्त आहे. अजून करोनाची लस उपलब्ध झालेली नाही त्यातच मतासाठी मोफत लसीचे गाजर दाखवणे हे भाजपने ताळतंत्र सोडल्याचा प्रकार आहे. प्रत्येक भारतीयाला करोनाची लस मोफत मिळणे हा त्यांचा अधिकार आहे, तो त्यांना मिळालाच पाहिजे. मंगळवारी राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सर्व भारतीयांना लस देण्यासाठी सरकारची तयारी आहे, असे सांगितले असताना बिहारच्या लोकांनाच मोफत लस देऊ, असे आश्वासन जाहीरनाम्यात देण्याचा भाजपचा हेतू काय? करोना लशीसाठी भारतीयांचा पैसा खर्च होणार आहे, मग तो फक्त बिहारसाठीच का? इतर राज्यात लस देणार नाही का? असे प्रश्न थोरात यांनी उपस्थित केले आहेत.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान विरोधी पक्षनेते व बिहार भाजपाचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी मोदीजींचे बिहारवर जास्त प्रेम आहे, असे म्हटले होते. मग महाराष्ट्रावर मोदींचे प्रेम नाही का? का कमी प्रेम आहे? आणि जर प्रेम कमी असेल किंवा प्रेमच नसेल तर महाराष्ट्राला मोफत करोना लस देणार नाही का? असा थोरात यांचा सवाल आहे.
निवडणुका आल्या की वारेमाप घोषणा करण्याचा रोग भाजपला जडला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत बिहारला सव्वा लाख कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली होती, त्या पॅकजचे काय झाले याचा बिहारच्या जनतेला मागील पाच वर्षांत अनुभव आला असून त्यांची फसवणूक झाली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या वेळीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले त्याचे काय झाले ते आज पाहतच आहोत. ही सगळी जुमलेबाजी असून त्यात भाजपचा हातखंडा आहे, असा थेट आरोप प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी केला.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…