महाराष्ट्र

पुण्यात भरदिवसा अपहरणाचा थरार, बंदुकीचा धाक दाखवून कारचालकाच्या अपहरणाचा प्रयत्न

पुणे : पुण्यातील पुनावळे येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. लिफ्ट मागितलेल्या व्यक्तीने कार चालकाचेच अपहरण करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी मुंबई-बेंगळुरू महामार्गावर सर्व्हिस रोड येथे ४४ वर्षीय व्यक्तीचा चौघांनी बंदुकीच्या धाकावर अपहरणाचा प्रयत्न केला. मात्र, काही अंतरावर कारचालकाने त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली.

या प्रकरणी सुरेशचंद्र जोशी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चार जनांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, खाकी गणवेशातील व्यक्तीने त्यांच्याकडे लिफ्ट मागितली. काही अंतरावर आणखी तिघे कारमध्ये जबरदस्ती बसले. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून अपहरणाचा प्रयत्न केला. मात्र, थोड्याच वेळात प्रसंगावधान राखून जोशी कारमधून उतरले आणि धावत सुटले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील सर्व्हिस रोडनजीक साई मिलेनियम शॉपिंग सेंटरजवळ सोमवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास ही घटना घडली. सुरेशचंद्र जोशी कार घेऊन काही खासगी कामानिमित्त जात होते. त्यावेळी खाकी गणवेशातील एक व्यक्ती हातात काठी घेऊन जात होती. त्या व्यक्तीने लिफ्ट मागितली. ती व्यक्ती सुरक्षा रक्षक असावी असे जोशींना वाटले. त्यांनी त्या व्यक्तीला लिफ्ट दिली. ते महामार्गाच्या दिशेने जात असताना, त्या व्यक्तीने कार थांबवण्यास सांगितले. जोशींनी कार थांबवली असता, ती व्यक्ती समोरच्या सीटवर येऊन बसली. त्या व्यक्तीच्या हातात बंदुक होती. काही वेळाने आणखी तिघे कारमध्ये मागच्या सीटवर बसले. त्यामुळे जोशी घाबरले. एकाने त्यांना मागच्या सीटवर बसण्यास सांगितले. त्याचवेळी प्रसंगावधान राखून जोशी कारमधून खाली उतरले आणि धावत सुटले.

जोशी यांनी थेट पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता, कार तिथेच सोडून चौघेही पसार झाले होते. या प्रकरणी अज्ञात चौघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago