महाराष्ट्र

अभिनेता आशिष वारंग यांचं अवघ्या 55 व्या वर्षी निधन; चित्रपटसृष्टीत शोककळा

मुंबई: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर दु:खाची सावली. अभिनेता आशिष वारंग यांचे 55 व्या वर्षी निधन झाले आहे. मूळचा गिरगावचा असलेला वारंग गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराशी झुंज देत होता.

बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमधून ही अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. त्यांच्या निधनाची माहिती प्रथम त्यांच्या भावाने, अभिजीत वारंग यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्टद्वारे दिली. पोस्टमध्ये अभिजीत यांनी लिहिले:
“वारंग आशिष दादा, तुम्हाला खूप मिस करू. प्रथम तुम्ही हवाई दल अधिकारी म्हणून देशाची सेवा केली आणि नंतर अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली. आम्ही एक चांगला माणूस गमावला आहे.”

आशिष वारंग हे अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये दिसले. त्यांनी ‘सूर्यवंशी’, ‘दृश्यम’, ‘मर्दानी’, ‘एक विलेन रिटर्न्स’ आणि प्रसिद्ध वेब सीरिज ‘द फॅमिली मॅन’ मध्ये आपली छाप सोडली. विशेषतः पोलिस व सहाय्यक भूमिकांमध्ये त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमठवला.

चित्रपटसृष्टीत पाऊल टाकण्यापूर्वी आशिष यांनी भारतीय हवाई दलात अधिकारी म्हणून राष्ट्रसेवा केली होती. मुख्य भूमिकांमध्ये जरी कमी दिसले, तरी त्यांच्या अभिनयाची गुणवत्ता आणि लोकप्रियता नेहमीच लक्षवेधी राहिली.

सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांनी आणि सहकलाकारांनी श्रद्धांजली वाहिली असून, त्यांच्या निधनाने मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago