मुंबई : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालय मुंबई शहर/उपनगर मार्फत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी महामंडळाच्या विविध योजनांकरिता कर्ज प्रस्ताव महादिशा पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे मुंबई शहर व उपनगर जिल्ह्याचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
अनुसूचित जाती आणि नवबौद्ध बांधवांच्या स्वयंरोजगार, आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक उन्नतीसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजना (पीएम-एजेएवाय) अंतर्गत ही अर्ज प्रक्रिया राबविण्यात येत आहे. रोजगाराच्या संधी निर्माण करून जीवनमान उंचावणे हा या योजनांचा मुख्य उद्देश असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे. अर्जाची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात होणार असून इच्छुक लाभार्थ्यांनी आपले अर्ज https://mpbcdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर करावेत. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे. प्रत्यक्ष कार्यालयात कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
अर्ज करण्यास आवश्यक पात्रता
अर्जदार अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील असावा व त्याचे वय १८ ते ५० वर्षे असावे. वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी तीन लाख रुपये आहे. अर्जदार हा या महामंडळाच्या योजनांचा व इतर वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
अर्ज करण्यास आवश्यक कागदपत्रे
जातीचा व उत्पन्नाचा सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या दाखला. पाच पासपोर्ट आकाराचे फोटो, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, आधारकार्ड, पॅन कार्ड ची प्रत.
कोटेशन व व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या जागेचा पुरावा, व्यवसायानुसार इतर दाखले, आवश्यकतेप्रमाणे प्रकल्प अहवाल, बँक खाते क्रमांक, पासबुकची झेरॉक्स प्रत आवश्यक आहे.
अनुदान योजना, बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना, राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ योजना, राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळाच्या योजना, एनएसएफडीसी व एनएसकेएफडीसी शैक्षणिक कर्ज योजना या सर्व योजनांची सविस्तर माहिती, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची यादी व पात्रतेच्या अटी महामंडळाच्या महादिशा पोर्टलवर उपलब्ध आहेत. तरी सर्व इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करण्यापूर्वी माहिती वाचून घेणे आवश्यक आहे. जास्तीत इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…