महाराष्ट्र

एकनाथ शिंदेंना आणखी एक धक्का, ‘ती’ १२९ कोटी रुपयांची निविदाही रद्द, चर्चांना उधाण

सोलापूर : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाल्यानंतर विरोधकांना मोठा धक्का बसला होता. मात्र, आता सत्ताधारी पक्षांतील अंतर्गत वाद समोर येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या बैठकींमध्ये उपमुख्यमंत्री बहुतेक वेळा गैरहजर राहत असल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री असताना घेतलेले अनेक निर्णय बदलले जात आहेत. शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना काढलेल्या काही महत्त्वाच्या निविदा रद्द झालेल्या आहेत.

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री असताना काढलेल्या १४०० कोटी रुपयांच्या निविदेला रद्द करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला. ही निविदा ४ वर्षांसाठी काढण्यात आलेली होती. झोपडपट्टीतील सफाई, मलनिस्सारण, शौचालय देखभाल आणि दारोदारी जाऊन घनकचरा गोळा करण्याच्या कामासाठी निविदा काढण्यात आली होती. गेल्या फेब्रुवारीत निविदा काढण्यात आली होती. या निविदेला अनेकदा मुदतवाढ दिली गेली. पण कायदेशीर त्रुटींमुळे ही योजना अडचणीत आली. त्यानंतर आता शिंदेंनी मुख्यमंत्री असताना काढलेली आणखी एक निविदा रद्द करण्यात आलेली आहे. पंढरपूरमधील दर्शन मंडप आणि स्काय वॉकच्या बांधकामासाठी काढलेली १२९ कोटी रुपयांची निविदाही रद्द करण्यात आली आहे.

गेल्या आषाढी यात्रेवेळी शिंदे यांनी पंढरपुरातील दर्शन मंडप आणि स्काय वॉकच्या कामाला मंजुरी दिली होती. त्यासाठी १२९ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली होती. विठुरायाच्या भक्तांना सुलभ आणि सुरक्षित दर्शन व्हावं यासाठी दर्शन मंडप उभारण्यात येणार होता. या कामाचा समावेश फडणवीस सरकारच्या पहिल्या १०० दिवसांच्या कामांमध्ये होता. पण आता अचानक निविदा रद्द करण्यात आल्यानं उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. बांधकाम खात्याकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.  वरिष्ठ पातळीवरुन आलेल्या आदेशांमुळे आणि तांत्रिक कारणामुळे निर्णय घेण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या दर्शन रांग आणि स्काय वॉकच्या कामाची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. शिंदे यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे.

सत्तास्थापना, खातेवाटप, आणि पालकमंत्रिपदावरून भाजप आणि शिवसेनेमधील तणाव अधिक वाढला आहे. तसेच, आमदारांची सुरक्षा कमी करण्यावरून देखील भाजप-शिवसेना संबंध ताणले गेले आहेत. सध्या शिंदे सरकारने घेतलेल्या निर्णयांवर आता तांत्रिक कारणांनी आणि वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशांमुळे पुनर्विचार केला जात आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

20 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

7 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago