अमरावती

महिलांमध्ये आर्थिक सक्षमीकरणाबाबत सकारात्मकता निर्माण करावी – प्रधान सचिव मनीषा वर्मा

अमरावती : रोजगाराविषयी प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण करुन रोजगार प्राप्त होईपर्यंत सहभागी महिला प्रशिक्षणार्थींचे सातत्याने समुपदेश करावे. प्रेरणादायी सत्र, उद्योजक कंपन्यांचे भरती मेळावे व विषय तज्ज्ञांच्या व्याख्यानांचे नियमीत आयोजन करावे. प्रशिक्षणानंतर रोजगार प्राप्त होऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याबाबत सकारात्मकता या महिलांमध्ये निर्माण करावी, अशा सूचना कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनीषा वर्मा यांनी दिल्या.

आकांक्षा कौशल्यातून जीवनोन्नतीकडे कार्यक्रमातंर्गत अमरावती व नागपूर विभागातील युवती व महिलांना कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणाऱ्या प्रशिक्षण प्रकल्पाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय विकास प्रशिक्षण प्रबोधिनी व नवगुरुकुल फाऊंडेशन फॉर सोशल वेलफेअर, दिल्ली यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवती व महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन त्यांना अर्थार्जनाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी ‘आकांक्षा कौशल्यातून जीवनोन्नतीकडे’ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सामंजस्य करारावर यावेळी स्वाक्षरी करण्यात आली.

जिल्हाधिकारी पवनीत कौर, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे उपायुक्त दत्तात्रय ठाकरे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक प्रदीप घुले, सहायक संचालक नरेंद्र येते, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी के विसाळे, प्रविण आत्राम, प्रबोधिनीचे संचालक गजेंद्र बावणे, नवगुरुकुल फाउंडेशच्या संचालिका निधी अनारकत आदी यावेळी उपस्थित होते.

या प्रकल्पातंर्गत प्रशिक्षणासाठी पदवी प्राप्त युवती व महिलांना संधी देण्यात येणार असुन त्यांची प्रवेशासाठी निवड करीत असतांना पालकांना प्रशिक्षणाबाबतचे नियम, निवासाबाबत असलेली सुरक्षितता, भोजन व आदी बाबींची माहिती देण्यात यावी. दुर्बल घटकातील महिलांना या प्रशिक्षणाच्या माध्यमातुन आर्थिक व सामाजिकदृष्ट्या स्थिरता प्रदान होईल असा विश्वास श्रीमती वर्मा यांनी व्यक्त केला.

अमरावती नागपूर विभागातील प्रशिक्षणासाठी इच्छुक 5 हजार 465 महिलांनी नोंदणी केली असून 2 हजार 224 महिलांनी ऑन लाईन चाळणी परीक्षा दिली. त्यापैंकी 1 हजार 307 महिलांनी ही चाचणी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. प्रवेशासाठी चार टप्प्यांमध्ये चाळणी परीक्षा घेण्यात येणार असुन प्रवेशाबाबत प्रक्रिया सुरु असल्याची माहीती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केद्रांचे सहायक आयुक्त प्रफुल शेळके यांनी दिली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago