महाराष्ट्र

कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा – विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर

नवी मुंबई : कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवून पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी प्रयत्न करावे. अशा सूचना कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या. कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस अप्पर प्रधान वनसंरक्षक(कांदळवन) एस. व्ही. रामराव उपस्थित होते.

कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणा, संस्था, अधिकारी यांनी योग्य समन्वय ठेवून तत्परतेने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात तसेच पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी विशेष प्रयत्न करावे अशा सूचना दिल्या. कांदळवनाच्या बाधित क्षेत्रावर तज्ञांच्या सल्ल्याने पुनर्स्थापना करणे, तसेच या संदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्षासह एक स्वतंत्र जिल्हास्तरीय व्यवस्थापन कक्ष तयार करणे, त्याचबरोबर भारतीय वन अधिनियम 1927, वन(संवर्धन) अधिनियम 1980 व पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, 1986 चा भंग होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, असेही बैठकीत सांगितले.

यावेळी रामराव यांनी मा. उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांच्या अंमलबजावणीबाबतच्या मासिक बैठकीच्या आढाव्याचे ईतिवृत्त कोकण विभागीय आयुक्तांच्या संकेतस्थळावर नियमित प्रसिध्द करणे, राज्यातील संवेदनशील कांदळवन क्षेत्र निश्चित करुन या क्षेत्रावर पोलिस यंत्रणा, वनसंरक्षक, महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षारक्षक यांच्या मार्फत निगराणी ठेवणे, कांदळवन क्षेत्रात वाहनांना प्रवेश बंदी करण्यासाठी उपाययोजना करणे, या क्षेत्रात सीसीटिव्ही बसविणे, कांदळवन क्षेत्रावर उपग्रहाव्दारे निगराणी ठेवून काही बदल निदर्शनास आल्यास समितीने त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. या कामांचा वेळोवेळी आढावा घेण्यात येईल अशा सूचना रामराव यांनी यावेळी दिल्या. कांदळवन संदर्भातील विविध विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

‘बार्टी’ कडून यूपीएससी-सीएपीएफ मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना २५ हजारांचे आर्थिक साहाय्य

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या…

2 दिवस ago

महाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

2 दिवस ago

भटक्या प्राण्यांकरिता निवारा उभारणीसाठी जागा शोधण्याचे निर्देश

मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची त्रैमासिक आढावा बैठक उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन)…

2 दिवस ago

मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग ‘मिसिंग लिंक’ : वेग, सुरक्षितता आणि आधुनिक अभियांत्रिकीचा संगम

मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा कणा मानला जातो. राज्यातील औद्योगिक, आर्थिक आणि…

2 दिवस ago

राज्यात सात जिल्ह्यांत एमआरआय सेवेचे लोकार्पण ; ११ जिल्ह्यांत मोफत डायलिसीस सेवेचा विस्तार

मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यातील आरोग्य सेवेला बळकटी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत, सात…

2 दिवस ago

फार्मर आयडी :२० मेपूर्वी नोंदणी करण्याचे आवाहन, अन्यथा योजनांचा लाभ बंद

मुंबई : ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप आपला फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तत्काळ नोंदणी करून…

2 दिवस ago