Reserve Bank of India
अहमदनगर : नगर अर्बन मल्टिस्टेट बँकेवर रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांसाठी काही निर्बंध लावले आहेत. त्यानुसार खातेदारांना १० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. याशिवाय इतरही बंधने लादण्यात आली आहेत. गेल्याच आठवड्यात बँकेची निवडणूक झाली. प्रदीर्घ प्रशासकीय राजवट संपवून दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी यांच्या गटाने पुन्हा सत्ता मिळविली आहे. त्यातच आता नव्याने आलेल्या संचालक मंडळाला या आव्हानांशी सामना करावा लागणार आहे. नगर जिल्ह्यासह राज्यातील अन्य जिल्हे आणि गुजरातमध्येही या बँकेच्या शाखा आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँकेचा हा आदेश सोमवारी संध्याकाळी मिळाला आहे. त्यानुसार कलम ३५ ए आणि कलम ५६ नुसार आजपासून पुढील सहा महिन्यांसाठी बँकेवर विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बँकेच्या संचालक मंडळाला कोणतेही नवीन कर्ज मंजुरी, जुन्या कर्जाचे नुतनीकरण, अॅडव्हान्स मंजूर करणे, कोणतीही गुंतवणूक करणे, नवीन ठेवी स्वीकारणे, ठेवी मोडणे, मालमत्ता हस्तांतरण अशा व्यवहारांसाठी रिझर्व्ह बँकेची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय खातेदारांना त्यांच्या बचत खात्यातून, चालू खात्यातून किंवा अन्य कोणत्याही खात्यातून दहा हजार रूपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. या नियमामुळे सामान्य खातेदार, व्यापारी, ज्यांची बचत तसंच व्यावसायिक खाती या बँकेत आहेत त्यांची तसेच ठेवीदारांचीही मोठी अडचण होणार आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…