लाइफ स्टाइल

हिवाळ्यात ‘अशाप्रकारे’ करा हळदीचे सेवन, मिळतील अनेक फायदे…

हिवाळ्याचा ऋतू एकीकडे उष्णतेपासून दिलासा देत असला तरी त्याच्याबरोबर अनेक ऋतूजन्य आजारही येतात. परंतु या आजारांपासून दूर राहण्याचे घरगुती उपाय माहिती असल्यास तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. हळद हा प्रत्येक भारतीय घराघरात उपस्थित असलेल्या सर्वोत्तम उपायांपैकी एक आहे. हळदीमध्ये थर्मोजेनिक गुणधर्म असतात. यामुळे आपल्या चयापचयला गती मिळते. शिवाय आपल्या कॅलरीही जलद गतीने कमी होतात.

औषधी गुणधर्मांमुळे हळद भारतीय पारंपारिक औषधांचा एक भाग आहे. हे एक नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट आहे आणि त्यात दाहक-विरोधी गुणधर्म देखील आहेत. हळद सर्दी, सायनस, सांधेदुखी आणि अपचन बरे करण्यास मदत करते. हळद घसा खवखवणे आणि बॅक्टेरियाच्या संसर्गापासून देखील आराम देते, जे हिवाळ्यात सामान्य असतात. तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात हळदीचा समावेश करू शकता.

हळद दूध :
हळदीचे दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे सर्दी, खोकला, जखम इत्यादी आजार बरे होतात. शिवाय रोग प्रतिकारशक्ती देखील वाढते. हळदीचा औषधासारखा देखील वापर केला जातो. जर तुम्ही दररोज रात्री हळदीचं दूध प्यायलात, तर तुम्ही वजन खूप लवकर कमी करू शकता. रात्रीच्या जेवणानंतर आणि झोपण्याच्या आधी जर तुम्हाला भूक लागली, तर हळदीचे दूध पिणे योग्य आहे.

हळद मसाला दूध
हे पेय भारतात शतकानुशतके प्यायले जाते. यासाठी एका भांड्यात दूध, हळद, दालचिनी पावडर आणि काळी मिरी उकळून घ्या. चवीनुसार तुम्ही त्यात साखर, मध किंवा गूळही घालू शकता. ते कोमट असतानाच प्या.

हळद आणि ओव्याचे पाणी
हे पेय बनवणे खूप सोपे आहे. यासाठी ओव्याच्या बिया रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसर्‍या दिवशी या पाण्यात हळद टाकून उकळा. नंतर हे पाणी गाळून प्या.

संत्री आणि आल्याचे डिटॉक्स पेय
संत्री आणि हळदीच्या पेयाने तुम्ही शरीर डिटॉक्स करू शकता. यासाठी एक संत्री, हळद, आले, गाजर यांचा रस काढून त्यात चवीनुसार लिंबाचा रस घाला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago