doctor commits suicide at health center shocking incident in ahmednagar district
अहमदनगर : डॉक्टरने आरोग्य केंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातल्या करंजी येथे ही घटना घडली. डॉ. गणेश शेळके असं आत्महत्या केलेल्या डॉक्टरांचं नाव असून त्यांनी सुसाईड नोटमध्ये आत्महत्येला तालुका वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी जबाबदार असल्याचे लिहीले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करंजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. गणेश शेळके हे आरोग्य अधिकारी म्हणून काम करत होते. डॉ शेळके यांना गेल्या 3 महिन्यांपासून पगार मिळालेला नव्हता. त्यातच त्यांना वरिष्ठांकडून पगार कपातीची देखील धमकी दिली जात होती. त्यामुळे त्यांनी आरोग्य केंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्त्येपूर्वी डॉ. शेळके यांनी सुसाईड नोटमध्ये आत्महत्त्येस तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान दराडे, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी जबाबदार असल्याचे लिहिले आहे. तसेच, पगार वेळेवर नाही, अतिरिक्त भार आणि पगार कपात करण्याची धमकी देत असल्याने या सगळ्याला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी लिहिले आहे.
पोलिसांनी याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. डॉ. गणेश शेळके यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून त्याचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करणार असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…