अचानक समोर शेळी आल्याने पिकअपचा भीषण अपघात, देवीचा नवस फेडण्यासाठी फेडण्यासाठी निघालेले 28 जण जखमी

नांदेड : किनवट तालुक्यातील शिवनी येथील पेट्रोल पंपाजवळ पिकअप पलटी होऊन भीषण अपघात झाला. रविवारी हदगाव तालुक्यातील हस्तरा बोरगाव येथील २8 जण तेलंगणा राज्यातील आडेली माता देवीचा नवस फेडण्यासाठी जात होते. मात्र अचानक त्यांच्या पिकअपसमोर एक शेळी आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून पिकअप पलटी झाला. या भीषण अपघातात एकूण २८ जण जखमी झाले आहेत. यातील १९ जण गंभीर जखमी झाले असून रुग्णांना उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आलं आहे. इतर जखमींवर हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हदगाव तालुक्यातील हस्तरा बोरगाव येथील एकाच कुटुंबातील नागरिक तेलंगणा राज्यातील आडेली माता देवीचा नवस फेडण्यासाठी गावातील काही लोकांना सोबत घेऊन पिकअपने निघाले होते. मात्र शिवनी येथे पिकअप समोर अचानक एक शेळी आल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात २८ जण जखमी झाले. दरम्यान, हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या मदतीने तात्काळ ५ ॲम्बुलन्सची व्यवस्था करून गंभीर जखमींना नांदेडमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जखमींची नावे :

  1. साहेबराव रामराव जाधव
  2. कोंडाबाई रामराव जाधव
  3. लोभाजी रामराव जाधव
  4. आशा लोभाजी जाधव
  5. अंजली लोभाजी जाधव
  6. प्रभाकर रामराव जाधव
  7. सुभाष रामराव जाधव
  8. भाग्यश्री प्रभाकर जाधव
  9. अंकिता साहेबराव जाधव
  10. सुमन सुभाष जाधव
  11. परमेश्वर सुभाष जाधव
  12. संदीप सुभाषराव जाधव
  13. गायत्री संदीप जाधव
  14. रेखा सुभाष जाधव
  15. धनंजय विठ्ठलराव जाधव
  16. गोदावरी शिवराम जाधव
  17. चतुराबाई किशन उपरे
  18. मंजुषा प्रभाकर सोळंके
  19. खंडेराव बालाजी सोळंके
  20. भागवत भगवान सोळंके
  21. प्रभाकर दत्ताराव सोळंके
  22. गोदावरी देवानंद सोळंके
  23. शंकर नारायण सरोदे
  24. कौशल्य शंकर सरोदे
  25. प्रमोद वानखेडे
  26. कौशल्या प्रमोद वानखेडे
  27. रितेश प्रमोद वानखेडे
  28. गणेश वानखेडे
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago