महाराष्ट्र

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दोन ट्रकचा भीषण अपघात, काचा वाहून नेणारा ट्रक पलटी

पुणे : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर आज सकाळी भीषण अपघात झाला असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. एक्स्प्रेस वेवर भोर घाट पोलीस चौकीजवळ काचा वाहून नेणाऱ्या ट्रकची दुसऱ्या ट्रकला धडक बसल्याने हा अपघात झाला. सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एक्स्प्रेस वेवर वाहतूक संथ गतीने सुरू असून महामार्ग पोलिस वाहतूक सामान्य करण्याचा प्रयत्न करत आहेत.

अपघातानंतर काचा वाहून नेणारा ट्रक पलटी झाल्यामुळे काचा मुंबईच्या दिशेने संपूर्ण रस्त्यावर पसरल्या, त्यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या वाहतुकीवर परिणाम झाला. त्यामुळे, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून वाहने वळवण्यात आली. अपघातानंतर लगेचच ट्रक रस्त्यावरून बाजूला काढण्यासाठी आयआरबी, स्थानिक पोलिसांसह बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर मुंबईकडे जाणारी अवजड वाहनांची वाहतूक ठप्प झाली होती.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago