A Tanker Accident On Ghodbunder Road In Thane 2 People Got Injured
ठाणे : केमिकल वाहतूक करणारा टँकर पलटल्याची घटना ठाण्यातील घोडबंदर रोडवर घडली आहे. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ठाणे महानगरपालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, केमिकल वाहतुकीसाठी रत्नागिरीकडे निघालेल्या टँकर मध्यरात्रीच्या सुमारास ठाण्यातील घोडबंदर रोडला पलटला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. अपघातग्रस्त टँकरमधून दोन जणांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
वर्दळीच्या रस्त्यावर टँकर पलटल्याने काही काळासाठी या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अखेर ३ तासानंतर टँकर रस्त्यातून हटवण्यात आला आणि वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. दरम्यान, अपघातानंतर टँकरमधील केमिकल संपूर्ण रस्त्यावर पसरले होते. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून रस्ता स्वच्छ करण्याचं काम सुरू होतं.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…