महाराष्ट्र

दिव्यांगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापनेबाबत तातडीने प्रस्ताव तयार करावा – चंद्रकांत पाटील

मुंबई : दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करावा, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

मंत्रालयात दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापनेसंदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीला आमदार बच्चू कडू, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, या विद्यापीठाच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील, आणि त्यामुळे त्यांच्या कौशल्यांचा विकास होईल, विद्यापीठाचा प्रस्ताव तयार करताना या विद्यार्थ्यांना शैक्षणिक पाठ्यक्रमांसोबतच विशेष प्रशिक्षण कार्यक्रम, संशोधन आणि इतर उपक्रमांमध्ये अधिकाधिक सहभागी होण्याची संधी उपलब्ध होईल असा प्रस्ताव तयार करावा. प्रस्ताव तयार झाल्यानंतर मंत्रीमंडळ बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.

या निर्णयामुळे दिव्यांगांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला नक्कीच गती मिळेल असेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago