महाराष्ट्र

प्रवासी सुविधांनीयुक्त नवीन सातारा बस स्थानकाची करणार निर्मिती

मुंबई : सातारा शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाची वास्तू जुनी झाली असून येथील प्रवासी सुविधांवरही मर्यादा येत आहेत. सातारा शहरातील बस स्थानकाची वास्तू पूर्णपणे पाडून त्या ठिकाणी नवीन बस स्थानकाची निर्मिती करावी. यामध्ये प्रवासी सुविधांना अधिक प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.

मंत्रालयीन दालनात आज सातारा बस स्थानक दुरूस्ती व सुशोभीकरण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देसाई बोलत होते. बैठकीस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, महामंडळाचे महाव्यवस्थापक (बांधकाम) दिनेश महाजन उपस्थित होते.

सातारा येथील संपूर्ण बसस्थानकाचा कायापालट करण्याचे निर्देश देताना राज्य उत्पादन शुल्क मंत्री देसाई म्हणाले की, बस स्थानक निर्मितीचा प्रस्ताव सादर करावा. बस स्थानकाचा चांगला आराखडा अंतिम करावा. बस स्थानकामध्ये प्रवासी सुविधांना प्राधान्य देण्यात यावे. बांधकाम एकाच टप्प्यात शक्य नसल्यास दोन टप्प्यात करावे. बस स्थानकाचा दर्शनी भाग आकर्षक करून प्लॅटफॉर्मची संख्या वाढविण्यात यावी, प्रवाशांसाठी स्वच्छतागृह, चालक, वाहक यांच्यासाठी निवासाची दर्जेदार व्यवस्था करण्यात यावी. पाटण येथील बस स्थानकाचे काम पूर्ण करावे. बस स्थानकावर चार्जिंग स्टेशनची व्यवस्था करण्यात यावी. सातारा जिल्ह्यातील मरळी, हिरवडी व तराळी बस स्थानकांची कामेही गतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही मंत्री देसाई यांनी दिल्या.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago