Legislature
मुंबई : शेतकऱ्यांची बोगस बि-बियाणे, खत, कीटकनाशक खरेदी करताना फसवणूक होऊ नये यासाठी नवीन कायदा लवकरच आणणार आहोत, असे कृषीमंत्री धनजंय मुंडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सांगली जिल्ह्यात बनावट भेसळयुक्त कृषी औषधांची विक्री होत असल्याबाबत सदस्य अरुण लाड यांनी लक्षवेधी सूचना मांडली. त्याला उत्तर देताना कृषीमंत्री मुंडे बोलत होते.
मंत्री मुंडे म्हणाले, कृषी निविष्ठा विक्री केंद्राची तपासणी करून कीटकनाशनांचे नमुने काढण्यात आले. कीटकनाशके खरेदी करताना घ्यावयाची काळजी याबाबत प्रचार व प्रसिद्धी करण्यात आलेली आहे. तसेच राज्यात भेसळयुक्त बोगस बि बियाणे, खत आणि कीटकनाशके यापासून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषीमंत्री, महसूल मंत्री, ग्राम विकास मंत्री, आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आली असून अशाप्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई नवीन कायद्याअंतर्गत करण्यात येईल. त्याचा प्रारूप आराखडा अंतिम टप्प्यात आहे, असेही कृषीमंत्री मुंडे यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे, अनिकेत तटकरे यांनी सहभाग घेतला.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…