महाराष्ट्र

धक्कादायक : नौदलातील अधिकाऱ्याचं अपहरण, खंडणी देण्यास नकार दिल्यावर जिवंत जाळलं

घोलवड पोलीस ठाणे हद्दीतील पालघरमधील वेवजीच्या जंगलात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. नौदलात अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या सुरजकुमार मिथिलेश दुबे (वय २७) यांचे अपहरण करून वेवजीच्या जंगलात अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्यात आले. ही घटना शुक्रवारी(५ फेब्रुवारी) घोलवड पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. सुरजकुमार दुबे यांना उपचारासाठी मुंबईला नेले जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरजकुमार दुबे हे मूळचे झारखंडमधील रांची येथील आहेत. ते २०१९ पासून नौदलात कार्यरत होते. सध्या ते आयएनएस अग्रणी या नौकेवर कर्तव्य बजावत होते. ३० जानेवारी रोजी सुट्टी संपल्याने ते रांची येथून विमानाने निघाले. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ते चेन्नई येथे विमानतळावर पोहोचले तेव्हा तीन अज्ञातांनी त्यांच्यावर बंदूक रोखली व त्यांना जबरदस्ती एका गाडीत बसवून त्यांचे हात-पाय बांधले. अपहरण केल्यानंतर त्यांच्याकडे १० लाख रुपयांची खंडणी मागितली. सुरजकुमार दुबे यांनी ही रक्कम देण्यास नकार दिला होता.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago