No police recruitment on contract basis - Deputy Chief Minister Devendra Fadnavis
मुंबई : राज्यात लवकरच पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार आहे. गृहविभागातर्फे 7 हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी एकाचवेळी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे, त्यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
गृहविभागातर्फे 7000 पदांसाठी ही भरती प्रक्रिया जून महिन्यामध्ये पार पडण्याची शक्यता आहे. लवकरच यासंबंधीची जहिरात देखील काढली जाणार आहे. त्यादृष्टीने गृहखात्याची सगळी तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती मिळत आहे. कोरोना काळात राज्यातली भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती. गेली दोन वर्ष कोणतीही पोलीस भरती झाली नव्हती. राज्यभरात लाखो तरुण पोलीस भरतीची तयारी करत आहेत. कित्येक महिन्यांपासून त्यांचे डोळे पोलीस भरतीकडे लागले होते. अखेर 7000 पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्यातील विविध पोलीस आयुक्त कार्यालयात आणि जिल्हा पोलीस कार्यालयांमधील 2019 च्या भरती प्रक्रियेनुसार 5200 पदांची भरती होणार होती. ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून निवड झालेले उमेदवार सेवेत रुजू होत आहेत.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…