महाराष्ट्र

राज्यात ५०५१ कोटींचे गुंतवणूक करार, ९ हजार जणांना नोकरीची नवी संधी

मुंबई : दुबई वर्ल्ड एक्स्पोच्या अभूतपूर्व यशानंतर उद्योग विभागाने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा वेग कायम ठेवला असून विविध १२ कंपन्यांसोबत सुमारे ५०५१ हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई, अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंग, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन व विविध कंपन्यांचे उद्योजक यावेळी उपस्थित होते.

या निमित्ताने मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० या उपक्रमांतर्गत एकूण १.८८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करून ३ लाख ३४ हजारांहून अधिक रोजगार उपलब्ध करण्यात राज्य यशस्वी ठरल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नमूद केले. झालेल्या १२ सामंजस्य करारातून राज्यात ९००० पेक्षा जास्त नोकऱ्या निर्माण होतील, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.

गुंतवणूक करार पूर्णत्वास येण्यासाठी उद्योग विभागाने कंबर कसली आहे. या गुंतवणुकीद्वारे राज्याचा सर्वांगिण औद्योगिक विकास साधण्यात येणार आहे. या करारातून संरक्षण, अंतराळ संशोधन, माहिती-तंत्रज्ञान, जैव-इंधन, इलेक्ट्रीक वाहन निर्मिती, निर्यात प्रधान उद्योग, अन्न प्रक्रिया, स्टील, इथेनॉल, औषध निर्माण आदी क्षेत्राला चालना मिळणार आहे. या गुंतवणूकदारांमध्ये ग्रासिम इंडस्ट्रिज, सोलार एव्हीएशन, पद्मावती पेपर्स, देश ॲग्रो, डी डेकॉर या नामांकित कंपन्यांचा समावेश आहे.

अनेक दशकांपासून महाराष्ट्र राज्य औद्योगिकरणात आघाडीवर आहे. राज्याने आपल्या पायाभूत सुविधांचा वेग वाढविला असून शासनाच्या कृतिशील धोरणामुळे आणि प्रगतीशील दृष्टिकोनामुळे कोरोना काळातही राज्यात औद्योगिक गुंतवणूकीचा ओघ सतत वाढता ठेवला आहे, असे देसाई म्हणाले. या सामंजस्य कराराच्या निमित्ताने राज्यात धोरणात्मक गुंतवणुकीद्वारे रोजगाराच्या संधींना बळकटी देण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना यश येत असून त्यात सातत्य ठेवण्याचा उद्योग विभागाचा प्रयत्न असल्याचे देसाई यांनी सांगितले.

झालेले सामंजस्य करार :

(कंपनी, सेक्टर, ठिकाण, गुंतवणूक, रोजगार या क्रमाने ) ग्राझिम इंडस्ट्रिज लिमिटेड, केमिकल, महाड, १०४०, ५००. एसएमडब्लू प्रा. लि., अलॉय स्टील, देवळाली, १५८२, १५००. गॅँट क्यू स्टील, इंजिनिअरिंग, सुपा, १२५, १३०. सोलर एव्हीएशन प्रा. लि., सोलर, नवी मुंबई, ५००, ४५००. डागा ग्लोबल केमिकल प्रा. केमिकल, अति. कुरकुंभ, १४२, ३९०, पद्मावती पल्प अँड पेपर्स क्राफ्ट पेपर्स, अति. अंबरनाथ, २००, ४००. वंसुधरा ब्रदर्स प्रा, लि., मेडिकल, ऑक्सिजन, अति. लोटे परशुराम, १३२, ११५. एअर लिक्विड, फ्रान्स, ऑक्सिजन, बुटीबोरी १२०, ५०. सुफलाम इंडिस्टिज प्रा., इथेनॉल निर्मिती, देवरी ४००, ४००. एलजी बालकृष्णन, अँड ब्रदर्स प्रा. लि., ऑटोमोबाईल, अति. बुटीबोरी ३६०, ५००. देश ऍग्रो प्रा. लि., अन्न व प्रक्रिया, अति. लातूर, २००, १६०. डी डेकॉर एक्सपोर्ट्स, टेक्सटाइल्स, तारापूर, २५०, ६००

५०५१, ९१४५.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago